केस गळतीने त्रस्त आहात? घरच्या घरी करा हा उपाय
हल्ली अगदी तरुण वयापासून सर्व लोक केस गळतीने किंवा एलोपेशिया या केसांच्या तक्रारीने त्रस्त असतात.
पूर्वी वयाच्या साठीनंतर टक्कल पडू लागायचे परंतु हल्ली 30 वर्षाच्या च्या पुढेच केस गळती च्या समस्या सुरू होतात. यासाठी योग्य संतुलित आहार योग्य प्रमाणात पाणी पिणे, व्यायाम करणे, स्ट्रेस कमी करण्यासाठी स्माईल मेडिटेशन करणे या गोष्टी पण आवश्यक असतात. आपण बाजारातून बऱ्याच प्रकारची लोशन , तेलं असे काही बाही विकत आणतो. कधी ते आपल्याला सूट होते कधी सूट होत नाही किंवा जाहिरात केल्याप्रमाणे त्याचा फायदा मिळत नाही आणि किंमत खूप मोजावी लागते. अशावेळी अशा प्रकारचे बाह्य उपचार आपण जर घरच्या घरी केले तर ते आपल्याला फायदा देऊ शकतात.
केसांच्या वाढीसाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी तुम्ही एरंडेल तेल, कांद्याचा रस आणि रोझमेरी तेल एकत्र वापरू शकता. या तेलांमध्ये केसांसाठी आवश्यक पोषक तत्वे आणि गुणधर्म आहेत, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि केसगळती कमी करण्यास मदत करतात.
1) एरंडेल तेल (Castor Oil):
एरंडेल तेलामध्ये (castor oil) रिसिनोलिक ऍसिड (ricinoleic acid) असते, जे दाहक-विरोधी (anti-inflammatory) आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे (anti-bacterial) गुणधर्म आहेत. यामुळे टाळू निरोगी राहते.
हे ओमेगा-६ फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध आहे, जे केसांच्या वाढीस मदत करते
2) कांद्याचा रस (Onion Juice):
कांद्याच्या रसामध्ये सल्फर (sulphur) असते, जे केसांच्या वाढीसाठी महत्वाचे आहे.
3) रोझमेरी तेल (Rosemary Oil):
रोझमेरी तेल (rosemary oil) केसांची वाढ उत्तेजित करते आणि केस गळती कमी करते.
(या मिश्रणात तुम्ही हवे असल्यास खोबरेल तेल पण ऍड करू शकता)
प्रमाण:
एरंडेल तेल 1 चमचा,
कांद्याचा रस 1 चमचा
रोज मेरी ऑइल 4 ड्रॉप्स
घरी तेल कसे तयार करावे:
एरंडेल तेल आणि रोझमेरी तेल बाजारात सहज उपलब्ध आहेत.
कांद्याचा रस ताजा कांदा मिक्सरमध्ये वाटून किंवा किसून काढू शकता. आणि तिन्ही गोष्टी एकत्र करून घ्या. थोडे थोडेच
मिश्रण बनवा आणि वापरा.
अशा प्रकारे वापरावे:
हे मिश्रण बोटाच्या टोकांनी डोक्यावरील त्वचेला हलका मसाज करत लावावे, एक तास ठेवून देऊन नंतर केस धुवावेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा आणि हा उपाय तीन ते चार महिने करत राहावा.
Disclaimer:
कोणतेही नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी, पॅच टेस्ट (patch test) करणे महत्वाचे आहे.
तुम्हाला त्वचेची ऍलर्जी (allergy) किंवा इतर कोणतीही आरोग्य समस्या असल्यास, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि चांगली झोप घेणे देखील महत्वाचे आहे.