बालदिनानिमित्त कर्मयोगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम

बालदिनानिमित्त कर्मयोगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम
  • Positive News
  • नोव्हेंबर 17 2025

Share on  

बालदिनानिमित्त कर्मयोगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम

नाशिक : कर्मयोगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक यांच्या वतीने १४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील गंभीरवाडी जवळील ढवळेवाडी येथील अंगणवाडी तसेच नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील जुना गंगापूर नाका येथील अंगणवाडी क्रमांक ५ येथे बालदिन साजरा करण्यात आला.

या निमित्ताने लहान मुलांना शालेय उपयोगी वस्तू व खाऊचे किट वाटप करण्यात आले. तसेच बालदिन का साजरा केला जातो, याबाबत मुलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदस्य सूरज गलांडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याचा, विचारांचा आणि इतिहासाचा अत्यंत सुंदर परिचय मुलांना करून दिला. एका लहान मुलीने ‘चाचा नेहरू’ यांच्यावरील दोन ओळी सादर करून कार्यक्रमाचे वातावरण अधिक आनंदमय केले. या उपक्रमाने मुलांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. उमेश पटेल उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज पळसकर, सदस्य सूरज गलांडे, विनय शेरताटे, प्रवीण वराडे, दिनेश ढवळे, मेघा पळसकर तसेच गंभीरवाडी येथील अंगणवाडी सेविका मनीषा ढवळे, गंगापूर रोड येथील अंगणवाडी सेविका धनवटे मॅडम आणि देवकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पत्रकार रामदास शिद यांचेही मार्गदर्शन लाभले.

संबंधित बातम्या