मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करणारे केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करणारे केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
  • Positive News
  • ऑगस्ट 7 2026

Share on  

मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करणारे केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई येथे 'प्राईम फोकस स्टुडिओ - फेज 1'चे उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्राईम फोकस स्टुडिओच्या फेज-1 चे उद्घाटन हा केवळ एका इमारतीचा शुभारंभ नसून, मुंबईला जागतिक दर्जाच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करणारे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून भारतातील मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख आणि बळकटी मिळणार असून यामुळे मुंबईत अत्याधुनिक दर्जाच्या सेवा उपलब्ध होतील.

'वेव्ह्ज 2025' मध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ऑरेंज इकोनॉमीचे जागतिक केंद्र बनविण्याचा संकल्प केला असून, प्राईम फोकससारख्या संस्था त्या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक पायाभूत संरचनेमुळे भारतातील मनोरंजन क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळणार असून, देशातील युवांना जागतिक स्तरावर काम करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्याकडे असंख्य वैविध्यपूर्ण कथा आहेत. आपली संस्कृती आणि सांस्कृतिक परंपरा अत्यंत समृद्ध आहे आणि त्या वारशाचा प्रत्येक पैलू एक वेगळी कथा सांगतो. आता जगाने आपल्या सांस्कृतिक वारशात आणि इतिहासात दडलेल्या या सर्व कथा जाणून घेण्याची वेळ आली आहे. 'क्रिएटर इकॉनॉमी' आणि तिच्याभोवती निर्माण झालेली परिसंस्था भारताला या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी देत आहे. या संपूर्ण प्रवासाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि क्षमता प्राईम फोकस स्टुडिओच्या या कार्यालयात उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आगामी 'रामायण' हा चित्रपट याच स्टुडिओमध्ये साकार होत असून, तो भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल, असे नमूद करतानाच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लवकरच संपूर्ण फिल्म सिटीचा जागतिक दर्जाच्या रूपात पुनर्विकास करण्याची योजना प्रत्यक्षात आणली जाईल. 

यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, डीएनईजीचे ग्लोबल सीईओ व प्राईम फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या