परप्लेक्सिटी एआय कंपनीकडून वसईच्या विद्यार्थ्याला १ कोटी ६ लाखांचे पॅकेज!
वसई : वसईच्या विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी जितेंद्र प्रजापती याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
अलीकडेच परप्लेक्सिटी (Perplexity AI) या नामांकित आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीत तांत्रिक बिघाड झाला होता. कंपनीने हा प्रश्न सोडवण्यासाठी तरुण अभियंत्यांना खुले आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जितेंद्रने आपल्या कौशल्याच्या जोरावर तो बिघाड यशस्वीरित्या सोडवला.
जितेंद्रच्या या कामगिरीने प्रभावित होऊन परप्लेक्सिटी कंपनीने त्याला थेट १ कोटी ६ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असलेली सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी ऑफर केली आहे.
या उल्लेखनीय यशामुळे पालघर जिल्ह्यातून अशा प्रकारे निवड होणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे.
जितेंद्र सध्या भाईंदर येथे राहतो आणि वसईतील विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेत आहे.
महाविद्यालय प्रशासनाने या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत सांगितले की, “जितेंद्रने केवळ स्वतःचा नव्हे तर आमच्या संस्थेचाही गौरव वाढवला आहे.”
✨ जितेंद्रच्या बुद्धिमत्तेला सलाम – त्याच्या यशाने अनेक विद्यार्थ्यांना नवे प्रेरणास्थान मिळाले आहे.