वारी सेवेसाठी साकारलेली भक्तिभावाने नटलेली रांगोळी: भाग्यश्री देशपांडे यांची अद्वितीय कलाकृती

वारी सेवेसाठी साकारलेली भक्तिभावाने नटलेली रांगोळी: भाग्यश्री देशपांडे यांची अद्वितीय कलाकृती
  • Positive News
  • जून 16 2025

Share on  

वारी सेवेसाठी साकारलेली भक्तिभावाने नटलेली रांगोळी: भाग्यश्री देशपांडे यांची अद्वितीय कलाकृती

      पुणे : तळेगाव येथील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार भाग्यश्री देशपांडे यांनी या वर्षीच्या आषाढी वारीच्या निमित्ताने एक मनोहारी आणि भावपूर्ण रांगोळी साकारली आहे. ‘राम कृष्ण हरि’ या भक्तिरसात न्हालेल्या मंत्रोच्चारासह त्यांनी ही कलाकृती वारी सेवेस अर्पण केली आहे.

रांगोळी ही केवळ सजावटीसाठी नसून, भक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा संगम असतो, हे भाग्यश्रीताईंनी पुन्हा एकदा आपल्या रेखीव आणि सुबक कलेद्वारे सिद्ध केले आहे. वारकऱ्यांच्या पायांशी भक्तीचा अर्पण म्हणून साकारलेली ही रांगोळी सर्वांची मनं जिंकते आहे.

त्यांच्या या कलाकृतीतून वारकरी संप्रदायाचा आत्मा, वारीची भक्तिमय परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडते. 'राम कृष्ण हरि' या नामजपातून निर्माण होणारी आध्यात्मिक ऊर्जा या रांगोळीतून प्रत्ययास येते.

या रेखीव रांगोळीच्या माध्यमातून भाग्यश्री देशपांडे यांनी वारीच्या सेवेत एक अनोखा योगदान दिले असून, ही कलाकृती प्रत्येक वारकऱ्याच्या मनात स्थान मिळवत आहे.

    राम कृष्ण हरि 

संबंधित बातम्या