सिन्नर | सकल मराठा परिवार, सिन्नर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.राज्य रक्त संकलन विभागाने दिलेल्या आव्हाना ला प्रतिसाद देत हे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वाढत्या रक्ततुटवड्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे शिबिर हुतात्मा स्मारक, हॉटेल जिनाईन शेजारी, आडवा फाटा, सिन्नर येथे सकाळी १० ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. “रक्तदान करणे म्हणजे एक महान पुण्यकर्म असून वेळेची गरज ओळखून सर्वांनी सहभाग नोंदवावा,” असे आवाहन सकल मराठा परिवारतर्फे करण्यात आले आहे.
शिबिराच्या तयारीसाठी सकल मराठा परिवारा कडून नियोजन सुरू आहे.