सर्दी आणि खोकल्यासाठी झटपट आराम देणारे ४ घरगुती उपाय
हवामान बदलत असताना सर्दी आणि खोकला होणे ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेक लोकांना त्रस्त करते. अनेकजण अशा वेळी थेट औषधांकडे वळतात. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते सर्दी-खोकला प्रामुख्याने विषाणूंमुळे होतो आणि त्यासाठी विशिष्ट औषध नाही; उपचार हे लक्षणांवर आधारित असतात.
तरीही, काही घरगुती उपाय असे आहेत जे सर्दी आणि खोकल्यावर तात्काळ आणि प्रभावी आराम देऊ शकतात. घरी सहज उपलब्ध असलेले काही नैसर्गिक घटक या त्रासावर गुणकारी ठरतात. अलीगढ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज (उत्तर प्रदेश) येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पीयूष माहेश्वरी यांनी सर्दी-खोकल्यावर घरच्या घरी करता येणारे काही उपाय सांगितले आहेत.
हळद ही आयुर्वेदातील एक प्रभावी औषधी घटक आहे. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे दाह कमी करण्याचे काम करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. झोपण्यापूर्वी अर्धा चमचा हळद कोमट दुधात मिसळून घेतल्यास घशाला आराम मिळतो, खोकला कमी होतो आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
तज्ज्ञांच्या मते, तुळस आणि लवंग हे सर्दी-खोकल्यावर अतिशय गुणकारी घरगुती उपाय आहेत. तुळस अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल आहे, तर लवंगमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात. तुळस व लवंग एकत्र उकळून काढा तयार करावा आणि तो दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावा. यामुळे घशाची सूज कमी होते, खोकल्याला आराम मिळतो आणि संसर्ग होण्यापासून प्रतिबंध होतो.
लिंबाचा रस आणि आलं यांचे मिश्रण कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास देखील चांगला फरक पडतो. लिंबूमध्ये ‘व्हिटॅमिन C’ भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आलं घशातील दाह कमी करते आणि खोकला रोखते. हा एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे जो सर्दी आणि खोकल्यावर त्वरीत आराम देतो.
वरील घरगुती उपाय साधे, सुरक्षित आणि बहुतेक प्रकरणांमध्ये फायदेशीर असले तरी, लक्षणे कायम राहिल्यास किंवा तीव्र असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.