मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सीएसआयआर स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह 2025' मध्ये उपस्थिती; नवउद्योजकांशी संवाद साधत स्टॉल्सना भेट

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सीएसआयआर स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह 2025' मध्ये उपस्थिती; नवउद्योजकांशी संवाद साधत स्टॉल्सना भेट
  • Positive News
  • मे 20 2025

Share on  

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सीएसआयआर स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह 2025' मध्ये उपस्थिती; नवउद्योजकांशी संवाद साधत स्टॉल्सना भेट 

         मुंबई, गोरेगाव येथे आयोजित ‘सीएसआयआर स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह 2025’ मध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासमवेत विविध स्टॉल्सना भेट देत पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी नवउद्योजक व संशोधकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या स्टार्ट-अप्सचे सादरीकरणही ऐकले.

कार्यक्रमात नवउद्योजकांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे व संशोधन आधारित प्रकल्पांचे सादरीकरण केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमांचे कौतुक करत स्टार्ट-अप्ससाठी राज्य सरकारच्या वतीने मिळणाऱ्या सहाय्याबाबत माहिती दिली.

या प्रसंगी मंत्री मंगल प्रभात लोढा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO), नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL), आणि नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (NEERI) चे संचालक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

या कॉन्क्लेव्हद्वारे स्टार्ट-अप क्षेत्रात संशोधन व विकासाला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

संबंधित बातम्या