"दिवाळीचा तिसरा दिवस
नरक चतुर्दशी
"नरक चतुर्दशी दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध करून वाईट प्रवृत्तीचा नाश केला. या पराक्रमाचे स्मरण या दिवशी करतात. सर्वांच्या आयुष्यातील दुखांचा नाश करावा हीच प्रभूचरणी प्रार्थना. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. रात्रीच्या समयी यम दीप दान करावे.
II कृष्णम् वंदे जगतगरु II
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!
प्रा.अमोल श्रीकृष्ण अहिरे व समस्त अहिरे परिवार, दाभाडी, ता. मालेगाव (नाशिक)