सातारा :शेतकऱ्याचे कष्ट हलके करणारा नांगर होतोय दुर्मिळ !
ट्रॅक्टरने शेत नांगरणा-या आजच्या पिढीला सांगायला गेलो तर त्यांना खरं वाटणार आणि पटणार ही नाहीय, एकेकाळी ह्या नांगराने कृषी क्षेत्रात खूप मोठी क्रांती केली होती,ह्याने शेतीतून समृद्धी वगैरै येवून शेतकऱ्यांची भरभराट झाली नसली तरी , शेतकऱ्यांचं कष्ट थोडं हलकं आणि सोपं झालं होतं.किर्लोस्कर कंपनीत कामाला असतांना कंपनीने तयार केलेले नांगर भाऊराव पाटल्यांने वेळ प्रसंगी आपल्या खांद्यावर वाहून नेहून त्यांची जाहिरात करून त्याची विक्री ही केली ,
हे करत असताना गाव खेड्यातील माणसांचे हाल अपेष्टांने भरलेले जीवन भाऊराव पाटलांना अगदी जवळून पाहायला मिळाले यातूनच बहुजनाच्या लेकरांसाठी शाळा कॉलेज आणि बोर्डींग सुरू करण्याची त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली आणि त्यांनी ते काम रयत संस्थेची स्थापना करून हाती घेतले एकीकडे लोखंडी औजारे वापरून शेती आणि दुसरीकडे गाव खेड्यातील लेकरांना शिक्षण हे त्या काळात सुरू झालं , शेतीतून नाही तर शिक्षणातून अनेक लेकरं पुढं आली आणि त्यांनी त्यांच्या शेतकरी आईबापाचे पांग फेडले ,
पुढं बैलांची संख्या कमी होत गेली आणि शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरं आले तसे बैलांने शेत नांगरने संपुष्टात आलं