नवी मुंबई : सुलभता, कार्यक्षमता आणि शाश्वततेच्या मुद्द्यांआधारे इनोव्हेशनचे स्टार्ट-अपमध्ये परिवर्तन!

नवी मुंबई : सुलभता, कार्यक्षमता आणि शाश्वततेच्या मुद्द्यांआधारे इनोव्हेशनचे स्टार्ट-अपमध्ये परिवर्तन!
  • Positive News
  • मे 20 2025

Share on  

नवी मुंबई : सुलभता, कार्यक्षमता आणि शाश्वततेच्या मुद्द्यांआधारे इनोव्हेशनचे स्टार्ट-अपमध्ये परिवर्तन!

           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज मुंबई येथे 'सीएसआयआर स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह 2025'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगात चीननंतर सर्वाधिक वेगाने वाढणारी स्टार्ट-अप इकोसिस्टीम भारताची आहे. एखाद्या इनोव्हेशनमध्ये, Is it bringing Efficiency, Is it bringing Ease of Living आणि Is it Sustainable या 3 गोष्टी असल्या तर ते स्टार्ट-अपमध्ये परिवर्तित होऊ शकते. स्टार्ट-अप इकोसिस्टीमची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे, एखादे इनोव्हेशन आकारास येते आणि त्यानंतर पुढच्या 2, 3 किंवा 4 वर्षांत ते युनिकॉर्नपर्यंत झेप घेते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 701 किमी लांबीचा किनारा लाभलेले महाराष्ट्र सागरी राज्य आहे. इथे मरीन इकॉनॉमी व मरीन सस्टेनेबिलिटीची असीम संभावना आहे. मरीन रोबोटिक्स, क्लीन फ्युएल यात आता नवे प्रयोग होत आहेत. तसेच, आपल्या येथील जलसाठ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेले आहे. सस्टेनेबल तंत्रज्ञानाने यावर प्रक्रिया केली तर आपण आपले जलसाठे स्वच्छ करु शकतो. म्हणून यात अधिकाधिक इनोव्हेशन व स्टार्ट-अपची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्टार्ट-अप्स येत आहेत. सर्क्युलर इकॉनॉमी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर स्टार्ट-अप येत आहेत. आज सीएसआयआर-एनआयओ, एनसीएल, नीरी या 3 संस्थांनी एकत्र येऊन स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह 2025 आयोजित केले. आगामी काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या जेवढ्या संस्था आहेत, त्या सर्व संस्थांना एकत्र घेऊन  स्टार्ट-अप कॉन्क्लेव्हचे आयोजन करु, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्य शासनाने स्टार्ट-अप्ससाठी ₹120 कोटींचा फंड्स ऑफ फंड उभा केला आहे, असे सांगत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या प्रयत्नाने महाराष्ट्र देशाचे स्टार्ट-अप कॅपिटल झाल्याचे सांगितले. स्टार्ट-अप इंडियाच्या 2025च्या ताज्या अहवालानुसार स्टार्ट-अप्सची संख्या आणि एकूण गुंतवणूक यात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. सीएसआयआर-एनआयओ, एनसीएल, नीरी या तिन्ही आयकॉनिक संस्थांच्या माध्यमातून या स्टार्ट-अप इकोसिस्टीमला आपण आणखी पुढे घेऊन जाऊ, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, नवी मुंबईत 300 एकरमध्ये इनोव्हेशन सिटी उभी करत असून यासोबतच एड्यु सिटीदेखील तयार करत आहोत, असे सांगत आगामी काळात राज्यातील वेगवेगळ्या शहरांत, टियर 2 आणि टियर 3 या स्टार्ट-अप्सची संख्या वाढत असलेल्या शहरांतही अशाप्रकारच्या स्टार्ट-अप कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, एनआयओचे संचालक, एनसीएलचे संचालक, नीरीचे संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या