याच पार्श्वभूमीवर टपाल विभागाने आता एक नवी महत्वाकांक्षी सेवा सुरू केली आहे – "ज्ञान पोस्ट". या सेवेमुळे आता पुस्तकं व इतर शैक्षणिक साहित्य देशभरात कमी दरात पाठवता येणार आहे. खासगी कुरीअर सेवांच्या तुलनेत ही सेवा अधिक स्वस्त व विश्वासार्ह असल्यामुळे अनेक वाचक, विद्यार्थी आणि प्रकाशक यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
टपाल विभागाच्या या उपक्रमामुळे शैक्षणिक साहित्याची देवाणघेवाण अधिक सुलभ होणार असून ज्ञानप्रसारासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.