गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
  • Positive News
  • जून 11 2025

Share on  

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

नाशिक:  दिनांक 11 जून वृंदावन नगर, आडगाव शिवारातील गार्डन कौंटी सोसायटी मधील 10 वी व 12 वी मधील नेत्रदीपक यश  संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

दहावी मधील
कुमारी शौर्या उपासे 94%
कुमारी शौर्य द्विवेदी 93%
कुमार दुर्गेश सरोटे 92%
कुमार वंशराज निमसे 85%
कुमार सिध्दांत बाल्टे 85%
कुमार विनय सिंग 82%
कुमार समर्थ लभडे 80%
कुमार अभय बोरसे 80%

बारावी मधील

कुमारी राधिका गुप्ता 92%
कुमार अद्वैत चांदोरे 91%
कुमारी निशिगंधा जमदाडे 78%
कुमार अगस्त्य गावंडे 78%
कुमार आदित्य वरोडे 76%

सोसायटी मध्ये विद्यार्थी, पालक, जेष्ठ नागरिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोसायटीचे चेअरमन डॉ. सुहास घुगे यांनी भूषविले. सुरवातीला रामदास निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले त्यातच त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ डॉक्टर इंजिनिअर न होता स्पर्धात्मक परीक्षा (एम. पी. एस. सी. सारख्या) देऊन प्रशासकीय अधीकारी बना, देश सेवा करा असे प्रोत्साहित केले, प्राध्यापक रणजित गावडे व प्रा. डॉ. गणेश पाटील यांनी विद्यार्थी वर्गाला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले यात त्यांनी केलेल्या अभ्यासाचे नियोजन व पुढील स्वप्न व्यक्त केले. श्री शंकरराव आहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले डॉ. सुहास घुगे यांनी अध्यक्षीय भाषण केले कार्यक्रमासाठी प्रवीण डीमले, अविनाश खांडेकर, अरविंद गुप्ता, दिलीप शिंदे, बाबूलाल सांगळे, नगराज पाटील, ज्ञानदेव गमे, सुखदेव टलें, डॉ. रवींद्र चांदोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
 

संबंधित बातम्या