भविष्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या प्रकल्पांना 'महाप्रित'ने प्राधान्य देण्याचे निर्देश!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे महात्मा फुले रिनेव्हेबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी (MAHAPREIT)च्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत खालील प्रकल्पांचा आढावा घेतला:
ठाणे समूह विकास प्रकल्प
सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि डेटा सेंटर प्रकल्प
भिवंडी महानगरपालिके अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीचा रुफ टॉप सोलर प्रकल्प
एनटीपीसी ग्रीन सोबत सोलर/हायब्रिड प्रकल्प राबविणे
'डिस्ट्रिक्ट कूलिंग सिस्टीम' प्रकल्प
नागपूरमधील राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या आवारात सौर प्रकल्प उभारणे
पुणे महापालिकेचे एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर उभारणे
महालक्ष्मी मंदिर व परिसराचा पुनर्विकास
एनटीपीसी ग्रीन, एनआयआरएल, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-एसईसीआय यांच्या संयुक्त भागीदारीने उभारण्यात येत असलेले सौर ऊर्जा प्रकल्प
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत निर्देश दिले की, MAHAPREIT ने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकाळ उपयोगी पडतील अशा प्रकल्पांना प्राधान्य द्यावे. झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण करावेत आणि प्रत्येक क्षेत्रात प्रकल्प हाती घेण्याऐवजी ठराविक क्षेत्रातच तज्ज्ञता विकसित करून गुणवत्तापूर्ण कामगिरी करावी.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री संजय शिरसाट आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.