--II ● विवेक विचार ● II--
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३०७ वा दिवस
'मनुष्य निर्माण 'हा सर्व मानवी प्रयत्नातील मूलभूत प्रयत्न होय ! जेव्हा मनुष्य घडतो, तेव्हा ओघानेच समाज आणि राष्ट्र दोन्ही घडत असतात. राष्ट्राच्याच काय, पण विश्वाच्या पुनरुत्थानासाठी देखील मनुष्य निर्माण ही मूलभूत प्रक्रिया आहे. जेव्हा स्वतःविषयीचा, स्वार्थाविषयीचा कोणताही विचार आपल्या मनाला शिवत नाही तेव्हाच आपल्या हातून सर्वोत्कृष्ट कर्म घडते, तेव्हाच आपला सर्वात जास्त प्रभाव पडतो. पूर्णपणे निरपेक्ष व्हा, फलाविषयी पूर्णपणे उदासीन राहा; तेव्हाच तुम्ही यथार्थ कर्म करु शकाल. समस्त देवतांवर तुमचा विश्वास असला, मात्र तुमचा स्वतःवर विश्वास नसला तर, तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. स्वतःवर दृढ विश्वास ठेवा, तो अढळ राहू द्या आणि सर्व शक्तीशाली बना. जीवनात सफलता प्राप्त करण्याकरिता जबरदस्त इच्छाशक्तीची, प्रचंड आणि अविरत प्रयत्नांची आवश्यकता आहे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास ३० शके १९४८
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. २० जून २०२६
★ दक्षिणायन प्रारंभ
★ १८६९ किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्मदिन.
★ १८८७ भारतातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक (व्हिक्टोरिया टर्मिनस) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुरु झाले.
★ १९८७ जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचा स्मृतीदिन
★ जागतिक शरणार्थी दिन.
संकलन - प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक