३ मार्च २०२६ सूर्यग्रहण – वेळापत्रक व धार्मिक नियम

३ मार्च २०२६ सूर्यग्रहण – वेळापत्रक व धार्मिक नियम
  • Positive News
  • मार्च 3 2026

Share on  

३ मार्च २०२६ सूर्यग्रहण – वेळापत्रक व धार्मिक नियम

*ग्रहण स्पर्श - दुपारी ३. वा. २०. मिनिटे (ग्रहण प्रारंभ )*
*ग्रहण संमीलन - दुपारी ४ वा. ३४ मिनिटे* 
*ग्रहण मध्य. - सायंकाळी ५ वा ०४ मिनिटे* 
*ग्रहण उन्मीलन - सायंकाळी ५ वा ३३ मिनिटे*
*ग्रहण मोक्ष -   सायंकाळी ६ वा ४८ मिनिटे ( ग्रहण समाप्ती )*
                                                                                                                                                                                                                                          *वेधारंभ* - हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी ३ मार्च २०२६ च्या सूर्योदयापासून ग्रहणाच्या मोक्षा पर्यंत (सायंकाळी ६:४८पर्यंत) ग्रहणाचे वेध पाळावेत. 
बाल , वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.००  पासून ग्रहण मोक्षापर्यंत (सायंकाळी ६:४८) वेध पाळावेत.
ग्रहणातील नियम
खालील नियम हे दोन्ही (चंद्रग्रहण सूर्यग्रहण) ग्रहणासाठीचे आहेत.. ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालमधे देवपूजा, तर्पण, श्राध्द, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामधे) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन, व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. 
                                                                                                                                                                                                                                                                  अशोच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुध्दी असते . ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच पाण्यात व इतर पदार्थांवर दर्भ व तुलसीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत. पाण्यात गंगाजल गोमूत्र टाकावे.. ग्रहणात स्नान करुन पुजा, मंत्र स्तोत्र जप नामस्मरण करावे.. स्वतःला म्हणता येत नसेल तर निदान श्रवण करावे ( ऑडिओ ऐकावे) ग्रहण काळात झोपू नये, अशक्त / आजारी / गर्भवती आदींनी सुद्धा भले टेकून बसावे पूर्ण झोपण्याची टाळावे..
                                                                                                                                                                                                 
गर्भवती स्त्रियांनी देवाची उपासना करावी. मन्त्र जप नामस्मरण स्तोत्र पठण किवा निदान श्रवण करावे. घरातून बाहेर जाऊ नये. व ग्रहण काळी काहीही खाऊ नये. ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका. शांत आंनदी रहावे, ध्यान करावे नामस्मरण करावे, अति बडबड वैगेरे करू नये, मौन राहिल्यास सर्वोत्तम.. ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये, ग्रहणकाळात शौचास जाऊ नये.. (मलमूत्रत्याग करू नये ) ग्रहणकाळात शरीर समागम संभोग करु नये. ब्रह्मचर्य पालन करावे.. ग्रहणकाळात व्यसन, भांडण वादविवाद, चोरी, फसवणे इत्यादी करु नये.. तसे तर आयुष्यात कधीही हे करू नयेच्.. ग्रहणकाळात जीवजंतू व पशु पक्षी प्राणी वैगेरे हत्या करु नका. हे सुद्धा नुसते ग्रहण कालच नाही तर आयुष्यात कधीही करू नये..    
         
 ग्रहणकाळात स्वयंपाक भोजन करु नये. धुने भांडी धुणे, अडगळ काढणे -झाडपुस करणे, घराची स्वछता करणे आदि कामे नये. पाणी भरु नये.. इतर वेळी मात्र हे नियमित करावे.. ग्रहणाच्या दिवशी सण उत्सव व्रत आले असता वेधकाला आधी साजरे करावे.. पूजन वैगेरे हे केव्हाही करता येईल परंतु महाप्रसाद भंडारा भोजन इत्यादी हे मात्र वेधकाला पूर्वीच करावे.. आणि जर ग्रहणाआधी असे करता येत नसेल तर मात्र विद्वत जाणकार व्यक्तीला विचारून शास्त्रसंमत जे योग्य असेल ते करावे.. 
                                                                                                                                                                                                                                              ग्रहण संपल्यानंतर पाण्यात गंगाजल गोमूत्र टाकून स्नान करावे, घरात गंगाजल गोमूत्र शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे. शक्य असल्यास देवदर्शन दानधर्म करावे.. सर्वात मुख्य म्हणजे घाबरू नये शंका कुशंका करू नये.. चुकीची माहिती पसरवू नये.. एखाद्या माहितगार व्यक्तीकडून नीट माहिती घ्यावी.. आपले हे शास्त्र संपूर्णपणे विज्ञानावर आधारित असून ऋषीमुनींनी संपूर्ण समाजाचा विचार करून सर्वांचा उत्कर्ष व्हावा यासाठीच अनुभवनिष्ठ असे नियम बनवले आहेत.. जर एखाद्याला काही पाळायचे नसेल तर त्याने पाळू नये परंतु जो हे नियम पाळत असेल त्याला विरोध तरी करू नये.. ज्याची त्याची इच्छा तसेच ज्याचे त्याचे कर्म.. आपण स्वतः चांगले करत नाहीत तर निदान दुसरा करत असेल तर त्याला आडकाठी करू नये किंवा अपप्रचार करू नये..

 वेधकाल

  • हे ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे सूर्योदयापासून ते सायंकाळी ६:४८ पर्यंत वेध पाळावेत.

  • बालक, वृद्ध, आजारी, अशक्त व गर्भवती स्त्रिया यांनी सकाळी ११:०० पासून मोक्षापर्यंत वेध पाळावेत.

 ग्रहणातील प्रमुख धार्मिक नियम

 करावयाच्या गोष्टी

  • ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे.

  • जप, तप, दान, तर्पण, श्राद्ध, होम, देवपूजा करावी.

  • मंत्रजप, नामस्मरण, स्तोत्र पठण किंवा श्रवण करावे.

  • मोक्षानंतर पुन्हा स्नान करावे.

  • शक्य असल्यास दानधर्म व देवदर्शन करावे.

  • शांत, प्रसन्न व संयमी राहावे.

 टाळावयाच्या गोष्टी

  • ग्रहणकाळात झोप घेऊ नये.

  • भोजन, स्वयंपाक करू नये.

  • मलमूत्रत्याग टाळावा (अत्यावश्यक असल्यास शुद्धी करावी).

  • अभ्यंग, शरीरसंबंध, वादविवाद, व्यसन टाळावे.

  • स्वच्छता, धुणी-भांडी, पाणी भरणे अशी कामे करू नयेत.

  • गर्भवतींनी घराबाहेर जाऊ नये व उपासना करावी.

 अतिरिक्त सूचना

  • ग्रहण सुरू होताच अन्न व पाण्यावर दर्भ व तुळशीपत्र ठेवावे.

  • पाण्यात गंगाजल व गोमूत्र टाकावे (परंपरेनुसार).

  • मोक्षानंतर गोड नैवेद्य दाखवून मग भोजन करावे.

 महत्वाची सूचना

  • घाबरू नये, अफवा पसरवू नयेत.

  • ज्याला पाळायचे आहे त्याने श्रद्धेने पाळावे; इतरांनी विरोध करू नये.

  • प्रत्येकाची श्रद्धा व आचरण वेगवेगळे असू शकते.

सूचना / Disclaimer

वरील माहिती ही पारंपरिक धार्मिक श्रद्धा, धर्मशास्त्र आणि लोकपरंपरेनुसार दिलेली आहे. यातील नियम पाळणे हे पूर्णपणे वैयक्तिक श्रद्धा व इच्छेवर अवलंबून आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोनातून Solar Eclipse हे एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे. ग्रहणामुळे आरोग्य किंवा दैनंदिन जीवनावर थेट अपाय होतो याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

गर्भवती महिला, आजारी किंवा विशेष आरोग्यस्थिती असलेल्या व्यक्तींनी आरोग्यविषयक बाबींमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कृपया अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नये. श्रद्धा ठेवणे किंवा न ठेवणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे.

संबंधित बातम्या